Sunday, May 27, 2007

पाणी पुरी - Pani Puri

Pani Puri in English

साधारण ५० मध्यम पुर्‍या
वेळ: ६० ते ७० मिनीटे

pani puri recipe, puri for pani puri, golgappa recipe, puchka recipeसाहित्य:
३/४ कप बारीक रवा
२ टेस्पून मैदा
चवीपुरते मिठ
क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा)
तळण्यासाठी तेल

इतर संबंधित पाककृती:
पाणीपुरीचे स्टफिंग
पाणीपुरीचे पाणी

कृती:
१) रवा, मैदा आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे.
२) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे.
३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे.
४) पुर्‍या तळल्यावर जाळीच्या रॅकवर (जो बेक केलेला केक गार करण्यासाठी वापरतात) तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल.
५) पुर्‍या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्‍या नक्की कुरकूरीत राहतील.

Labels:
Pani Puri, Panipurichya purya, Golgappa, Golguppa, Puchka

No comments:

Post a Comment