Tuesday, September 4, 2007

बटाटा चिवडा - Batata Chiwada

Batata Chiwada in English

batata chiwada, Chuwda recipe, Chiwda recipe, maharashtrian recipe, potato hash, homemade potato hash
"हा बटाटा चिवडा करायला कडक ऊन असणे आवश्यक आहे." बटाटयाचा किस निट वाळणे आवश्यक असते. कोकणामध्ये उन्हाळ्यात हा बटाटयाचा किस वर्षभर पुरेल इतका वाळवून ठेवतात. खाली दिलेली कृती ९-१० डिशेस चिवडा
बनेल एवढे प्रमाण दिले आहे.

साहित्य:
४ मोठे बटाटे
मोठे छिद्रं असलेली किसणी
जाड प्लास्टिकची शिट (किमान ३ फुट x ३ फुट)
शेंगदाणे
तिखट
साखर
मीठ
बटाटयाचा किस तळण्यासाठी तेल

कृती:
१) रात्री बटाटे प्रेशर कूकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवावे. कूकरमधून काढून पेपरवर काढून घ्यावे. रात्रभर बाहेर ठेवावेत. दुसर्या दिवशी सकाळी ९-९.३० च्या सुमारास उन्हात प्लास्टिकची शिट घालावी.
२) बटाटे सोलून घ्यावेत. बटाटे थेट प्लास्टिक शिटवरच किसावे. बटाटे किसताना किसणीवर वरून खाली अशीच डिरेक्शन ठेवावी. एकदा किसून झाले कि बटाटा किंचित किसणीपासून उचलावा आणि पुन्हा वरून खाली अशी डिरेक्शन ठेवावी. किसणी आणि प्लास्टिक शिटमध्ये १/२ फूट अंतर ठेवावे.
३) बटाटा किसताना प्रत्येक वरून खाली अशा डिरेक्शननंतर किसणी थोडी पुढे करावी. म्हणजे किसलेला किस मोकळा राहिल, एकावर एक पडणार नाही.
४) अशा प्रकारे १-२ उन्हं दाखवून किस कडक वाळवावा.
५) गरम तेलामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्यावे. शेंगदाणे बाजूला काढून बटाटा किस तळून घ्यावा. किचन टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर अधिकचे तेल काढून टाकावे.
६) तळलेला किस थोडा गार झाला कि त्यात मीठ, पिठीसाखर, लाल तिखट आणि तळलेले शेंगदाणे घालून एकत्र करावे.

टीप: खाताना आवडत असल्यास खवलेला ओला नारळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि थोडी जिरेपूड घालावी.

Labels:
Chiwda recipe, Chiwada recipe, chivada recipe, Maharashtrian Chiwada recipe, Fast recipe, Fasting snacks, Upvas snacks, faral recipe

No comments:

Post a Comment