Tuesday, October 9, 2007

चण्याची उसळ - Chanyachi Usal

Chana Usal (English Version)

chana usal, chanyachi usal, chana sabzi, chana recipe, Indian grocery
साहित्य:
१/२ कप काळे चणे
२-३ टेस्पून ओला खवलेला नारळ
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी : १/४ टेस्पून मोहोरी, १/४ टेस्पून जीरे, १/४ टेस्पून हिंग, १/२ टेस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून चिंचेचा कोळ
२ टिस्पून किसलेला गूळ
२ टिस्पून चमचे तेल
२ टेस्पून कोथिंबीर
चवीपुरते मीठ

कृती:
१) चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी भिजलेले चणे निवडून घ्यावे. जर त्यात कडक राहिलेले चणे असतील तर ते काढून टाकावे.
२) छोट्या कूकरमध्ये तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, १ चमचा लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात ओला खवलेला नारळ घालावा. नारळ परतला कि त्यात भिजवलेले चणे घालावे व ३-४ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) कूकरमध्ये त्यात १ पेला पाणी घालावे. त्यात गोडा मसाला, चिंचेचा कोळ, किसलेला गूळ आणि मीठ घालावे.
४) कूकरला झाकण लावून ४-५ शिट्ट्या कराव्यात. वाफ मुरल्यावरच कूकर उघडावा. चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप:
१) जर छोटा कूकर उपलब्ध नसेल तर नेहमीच्या कूकरमध्ये अगोदर चणे शिजवून घ्यावे. आणि नंतर ते चणे कढईत वरील पद्धतीने फोडणीस घालावे.

Labels:
Chana usal, Chickpea Usal, black chickpea curry, Maharashtrian Curry, Chana Sabzi, CHana sabji, Chana recipe

No comments:

Post a Comment