Sunday, November 11, 2007

अचारी वांगे - Achari Vange

Achari Vange (English Version)

वांग्याचे आपण बर्याचदा ठराविकच पदार्थ करतो. त्यापेक्षा थोडी वेगळी, चविष्ठ आणि करायलाही सोपी अशी ही कृती..

vange recipe, baingan recipe, eggplant recipe, eggplant curry, vangyachi bhaji
साहित्य:
२ ते अडीच वाट्या वांग्याच्या फोडी
२-३ चमचे आंब्याचे लोणचे
१ लहान कांदा बारीक उभा चिरून
३-४ चमचे शेंगदाण्याचा कूट
१ चमचा धणेपूड
१ चमचा जिरेपूड
फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहोरी, जीरे, हिंग, हळद
१ चमचा लाल तिखट
कढीपत्ता
१ चमचा उडीद डाळ
बडीशेप
२ चमचे काजूचे तुकडे
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) वांग्याच्या फोडींना आधी लोणचे, धणेपूड, जिरेपूड लावून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता, थोडी बडीशेप घालून फोडणी करावी. काजूचे तुकडे, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ गोल्डन ब्राऊन झाली कि कांदा घालावा.
३) कांदा परतला कि त्यात धणे-जिरेपूड आणि लोणचे लावलेल्या वांग्याच्या फोडी घालाव्यात. शेंगदाण्याचा कूट घालावा. वांग्याच्या फोडी थोड्या परतल्या कि वरती झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. चव बघूनच मिठ घालावे कारण लोणच्यात भरपूर मीठ असतेच. चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप:
१) फोडी खुप जास्त मऊ करू नयेत, नाहीतर त्याची चव फार चांगली लागत नाही.

Labels:
Eggplant Recipe, Indian Brinjal Recipe, spicy Eggplant recipe, Fried eggplant.

No comments:

Post a Comment