Thursday, January 17, 2008

दडपे पोहे - Dadpe Pohe

Dadape Pohe (English Version)

dadpe pohe, pohe recipe, healthy recipe, healthy pohe recipe, heart healthy recipe, low cal recipe, Low oil recipe, Low Carb recipe
साहित्य:
३ मध्यम वाट्या पातळ पोहे
१ मध्यम कांदा
२-३ चमचे तेल
फोडणीसाठी: मोहोरी, हिंग, हळ्द
१ चमचा फोडणीची मिरची (मिरचीचे लोणचे)
पाऊण वाटी खवलेला ओला नारळ
कोथिंबीर
मीठ
लिंबू

कृती:
१) पोहे पातेल्यात थोडे भाजून घ्यायचे. ज्यामुळे ते थोडे चुरचुरीत होतात.
२) कढल्यात २-३ चमचे तेल गरम करावे मोहोरी, हळद, हिंग घालून फोडणी करावी.
३) भाजलेले पोहे परातीत घ्यावे. त्यात तयार केलेली फोडणी घालावी. नंतर कांदा, ओला नारळ, फोडणीची मिरची, मीठ, चवीपुरती साखर, लिंबू घालावे आणि चांगले चुरून घ्यावे. सर्व पोह्यांना घातलेली फोडणी आणि मिरचीचे लोणचे लागले पाहिजे. जर तिखटपणा जास्त हवा असेल तर लाल तिखट किंवा बारीक चिरलेली मिरची घालावी.
४) सर्व एकत्र करून ७-८ मिनीटे पोहे दडपून ठेवावेत. मग खावेत.

टीप:
१) दडपे पोहे बर्याच प्रकारे करता येतात. काहीजण पोह्यात कच्चे तेल वापरतात, काहीजण लिंबाऐवजी ताक वापरतात. आपल्या आवडीनुसार बदल करता येतात.

Labels:
Dadpe Pohe, Salty Snack Recipe, Marathi Recipe, Poha recipe, Maharashtrian Pohe recipe

No comments:

Post a Comment