Tuesday, January 8, 2008

चकली v 2

नमस्कार,

सर्व ब्लॉग वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाची सुरुवात म्हणून ब्लॉगवर काही नविन "स्टिकी पोस्ट्स" टाकत आहे.

१) हि रेसिपी येउ द्या! - Request Recipe
तुमची फर्माइश. ब्लॉग बघून तुम्हाला एखाद्या झकास पदार्थाची आठवण झाली आणि तो ब्लॉग वर नसला तर मला नक्की सुचवा. मी जसे साहित्य आणि वेळ मिळेल तसे प्रयत्न करून रेसिपी पोस्ट करेन. बर्याचवेळा काही नविन पदार्थ आपल्या खाण्यात येतो, पण त्याची रेसिपी मराठीत इंटरनेटवर नसते. तुमच्या प्रतिसादांमुळे आणि फर्माइशींमुळे छान छान रेसिपी मराठीत इंटरनेटवर यायला मदत होईल.

२) हे काहि जमले नाही बुवा! - Areas of Improvement
पाककृती म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. त्यामुळे बर्याचवेळा आपण ती "रिपीटेबल" असावी आणि स्थळ काल यावर अवलंबून नसावी असे गृहित धरतो. पण पाक "कले"तील कलेचा भाग म्हणजे बनवणार्याचा अनुभव,कौशल्यआणि पार्श्वभूमी आणि बर्याच गोष्टी. आता माझ्या बनवण्याच्या शैलीमुळे किंवा रेसिपी लिहिताना लेखनात राहिलेल्या काही त्रुटींमुळे पदार्थ बिघडला तर मला इथे कमेंट लिहून नक्की सुचवा. कदाचित कुठली पाककृती वाचून ती अजून चांगली करण्याची युक्ति तुम्हाला माहीत असेल ती कळवा. वाचकांपैकी अनेक अनुभवाने मोठे पाककलाकार आहेत, त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग सर्वांनाच होईल.

३) तांत्रिक/इतर सुचना - Other Suggetions
ब्लॉग विषयी इतर काहीही तुम्हाला सुचवायचे असेल तर इथे कळवा.बाकी काही आवडले, छान जमले तर आवर्जून लिहा. यावरील सगळ्याबरोबर छान छान कमेंटपण हव्यातच!

चकली.

No comments:

Post a Comment