Monday, February 18, 2008

दाबेली - Dabeli

Dabeli in English

dabeli, mumbai street chat, Mumbai Chat items

साहित्य:
लादी पाव ६-८ (पावभाजीचे पाव)
२ मध्यम उकडलेले बटाटे
३/४ कप डाळिंबाचे दाणे
१० ते १२ द्राक्षं
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप रोस्टेड शेंगदाणे
बारीक शेव (ऑप्शनल)
१ टेस्पून पावभाजी मसाला
१/२ टिस्पून चाट मसाला
२ टिस्पून तेल
मीठ चवीनुसार
बटर
हिरवी चटणी आणि चिंचगूळाची चटणी

कृती:
१) सर्वात आधी दोन्ही चटण्या तयार करून घ्याव्यात.
२) बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा. प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.
३) उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ टेस्पून पावभाजी मसाला घालावा. किसलेले बटाटे घालावे. मीठ घालावे. एकजीव करून घ्यावे.
४) एका मध्यम खोलगट ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली द्राक्षं, डाळींब आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे. थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
५) आपण वडापाव बनवताना पावाला तीन बाजूंनी चिर देतो तसे दाबेलीला लगतच्या दोन बाजूंना चिर द्यावी. त्यात चिंचगूळाची चटणी, हिरवी चटणी लावावी त्यात बटाट्याचे सारण घालावे. अजून हवे असल्यास थोडे डाळींबाचे दाणे, रोस्टेड शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.
तव्यावर १/२ टिस्पून बटर घालावे त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी. हवी असल्यास शेव लावावी. गरम गरम खावे.

Labels:
Bombay snack, mumbai street food, kacchi dabeli, dabeli recipe, recipe for dabeli

No comments:

Post a Comment