Monday, February 4, 2008

मटर पनीर - Matar Paneer

Matar Paneer in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: साधारण ४५ ते ५० मिनीटे (पूर्वतयारी: ३० मिनीटे, ग्रेव्हीसाठी: १५ मिनीटे )

mattar paneer recipe, muttar paneer, paneer mattar, oil free, north indian, low calorie foodसाहित्य:
२५० ग्राम पनीर (टीप १ आणि २)
१ कप हिरवे मटार (फ्रोजन)
१ मोठा कांदा, चिरून
४ मध्यम टोमॅटो, चिरून
खडा गरम मसाला (२ वेलची, १ तमालपत्र, ४ लवंगा, १ लहान काडी दालचिनी, ३ ते ४ मिरीदाणे) हा गरम मसाला (वेलची सोडून) खलबत्त्यात थोडा कुटून घ्यावा.
२ टिस्पून आलेलसूण पेस्ट (४ ते ५ मध्यम लसूण पाकळ्या + १/२ ते १ इंच आल्याचा तुकडा)
७-८ काजू बी
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचुर पावडर (टीप ६)
१/२ टिस्पून जिरे
१ हिरवी मिरची (ऐच्छिक)
१/४ टिस्पून हळद
१-२ टिस्पून लाल तिखट (टीप ५)
३ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ
१ ते २ टिस्पून साखर (टीप ७) (ऐच्छिक)
२ टेस्पून फेटलेले दही
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करावे. नंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. मिठ घालावे. कांदा शिजला कि हळद आणि आलेलसूण पेस्ट घालावी. जरावेळ परतून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊसर होवून शिजला कि हे मिश्रण थंड होवू द्यावे. नंतर हे मिश्रण मिक्सरवर थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यावे.
२) पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.
३) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात कुटलेला गरम मसाला मध्यम आचेवर १५ सेकंद परतावा. त्यात वेलची आणि जिरे घालावे. नंतर मिक्सरवर वाटलेले मिश्रण घालावे. थोडे पाणी घालावे. धणेजिरे पूड, साखर आणि लाल तिखट घालावे. मध्यम आचेवर ५-७ मिनीटे उकळी काढावी. हिरवी मिरची घालावी. हिरवे मटार घालून काही मिनीटे उकळी काढावी. पनीरचे तुकडे घालावेत. हलक्या हाताने ढवळावे. दही घालून मिक्स करावे. पनीर घातल्यावर जास्त वेळ भाजी ढवळू नये. चिरलेली कोथिंबीर पेरून गरमगरम सर्व्ह करावी.
हि भाजी रोटी नान किंवा अगदी भाताबरोबरही चविष्ट लागते.

टीप :
१) रेस्टोरेंटमध्ये पनीर बर्‍याचदा फ्राय करून वापरतात. पनीर जेवढे फ्रेश असेल तेवढी भाजीला टेस्ट छान येते. फ्रेश पनीर फ्राय न करताच भाजीत वापरता येते. पण पनीर जर फ्रेश नसेल तर ते शालो फ्राय करून घ्यावे. मगच भाजीत वापरावे.
२) होल मिल्कचे पनीर खुप चविष्ट परंतु अगदी लुसलुशीत असे बनते. अशावेळी पनीर बनवून २ दिवस फ्रिजमध्ये ठेवावे आणि जेव्हा शालो फ्राय करायचे असेल त्यावेळी फ्रिजमधून बाहेर काढावे. तुकडे करून मिडीयम लो फ्लेमवरच शालो फ्राय करावे.
३) जर खडा गरम मसाला नसेल तर १ चमचा गरम मसाला घालावा. पण शक्यतो खडा गरम मसालाच वापरण्याचा प्रयत्न करा, त्याने उत्तम फ्लेवर येतो.
४) मी फ्रोजन मटार वापरले होते. जर ताजे मटार वापरणार असाल तर कांदा टोमॅटोच्या मिश्रणात मध्यम आचेवर ७ ते ८ मिनीटे शिजू द्यावे.
५) चांगला लाल रंग येईल असे लाल तिखट वापरावे. मी ’देगी मिर्च’ लाल तिखट वापरले होते.
६) कधी कधी टोमॅटोला आंबटपणा कमी असल्याने भाजीलाही आंबटपणा कमी येतो किंवा येतच नाही. भारतात मिळणार्‍या टोमॅटोंना शक्यतो गरजेपुरता आंबटपणा असतो तेव्हा चव पाहून मगच आमचुर पावडर वापरावी.
७) साखरेच्या अगदी किंचीत चवीने भाजीचा स्वाद आणखी वाढतो.

Labels:
Paneer Recipe, Mutar Paneer recipe, spicy paneer recipe, Punjabi paneer recipe, Indian Paneer Recipe

No comments:

Post a Comment