Tuesday, August 4, 2009

लेमन राईस - Lemon Rice

Lemon Rice in English

२ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

lemon rice, South Indian lemon rice recipeसाहित्य:
अडीच कप शिजलेला मोकळा भात (शिळा भात चालेल)
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
१/८ ते १/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून किसलेले आले
४ ते ६ कढीपत्ता पाने
मूठभर शेंगदाणे
१/२ टिस्पून उडीद डाळ
३ लाल सुक्या मिरच्या, तोडून
दिड टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
कोथिंबीर, बारीक चिरून

कृती:
१) भात हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात मिठ आणि लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करावे. शितं अख्खी राहू द्यावीत.
२) कढईत तूप गरम करावे, त्यात शेंगदाणे ब्राऊन होईस्तोवर परतावे. शेंगदाणे परतले कि त्यात जिरे, हिंग, आले, कढीपत्ता, उडीद डाळ, लाल मिरच्या घालून परतावे आणि भात फोडणीस घालावा. व्यवस्थित परतावे. कोथिंबीर पेरून गरमा गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) जर ताज्या भाताचा लेमन राईस बनवायचा असेल तर भात मोकळा शिजवावा आणि मोठ्या ताटात पसरवावा, थोडा गार झाला कि अर्धा तासभर फ्रिजमध्ये ठेवावे आणि नंतर फोडणीस घालावा.
२) उरलेल्या भातापासून फोडणीभात, टॅमरिंड राईस करता येतो, तसेच इतर भाताचे प्रकार इथे पाहा.
Label:
Lemon Rice, South Indian lemon rice recipe

No comments:

Post a Comment