Thursday, August 6, 2009

मूगाचे पॅटीस - Moong Patties with Soya Granules

Moong Patties in English

८ पॅटीस
वेळ: ३० मिनीटे (सर्व साहित्य तयार असल्यास)

moong patties, healthy patties, ragda pattis, Soya granules,साहित्य:
१/२ कप मुग
१/२ कप सोया ग्रॅन्युल्स (Soya Granules)
१ मध्यम बटाटा, उकडून मॅश करून घेणे
१/२ कप ब्रेड क्रम्स
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ टिस्पून गार्लिक पावडर
१ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून गरम मसाला
१/२ ते १ टिस्पून चाट मसाला
चवीपुरते मिठ
तेल

कृती:
१) मूग १० तास भिजवून घ्यावेत, त्यातील कडक राहिलेले मूग काढून टाकावेत. मोड येण्यासाठी साधारण ६ ते ८ तास सुती कपड्यात बांधून ठेवावे. मोड आलेले मूग प्रेशर कूकरमध्ये दोनच शिट्टया करून शिजवून घ्यावे. शिजवताना कूकरमध्ये पाणी घालावे आणि कूकरच्या आतील डब्यात पाणी न घालता मूग आणि मीठ घालावेत.
२) सोया ग्रॅन्युल्स उकळत्या पाण्यात घालून ५ मिनीटे शिजवावेत. गार झाल्यावर ग्रॅन्युल्स पिळून घ्यावेत.
३) एका मोठ्या बोलमध्ये शिजवलेले मूग, सोया ग्रॅन्युल्स, ब्रेड क्रम्स, शिजवलेला बटाटा, गार्लिक पावडर, जिरे, गरम मसाला, चाट मसाला, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मिठ असे घालून मिक्स करावे. मिडीयम साईजचे पॅटीस बनवा.
४) तवा तापवावा. प्रत्येक पॅटीसला तेल लावून तव्यावर मध्यम आचेवर ब्राऊन करून घ्यावे.
हे पॅटीस बर्गरमध्ये खुप छान लागतात.

मी ७ ते ८ पॅटीस बनवून झिप लॉक बॅगमध्ये ठेवून डिप फ्रिझरमध्ये ठेवले. साधारण १५-२० दिवस हे पॅटीस फ्रिजरमध्ये छान राहतात. हवे तेव्हा मायक्रोवेवमध्ये गरम करून बर्गर बनवावे.

टीप:
१) थंड हवामानाच्या ठिकाणी कडधान्याला मोड चटकन येत नाहीत. यासाठी भिजवलेले मूग सुती कपड्यात घट्ट बांधून ठेवावेत. ओव्हन २५० F वर २-३ मिनीटे गरम होवू द्यावा आणि बंद करावा. ओव्हन स्विच ऑफ करूनच मधल्या जाळीवर बांधलेले मूग ठेवावेत, ६ ते ८ तासात मोड येतात. ओव्हन खुप गरम करू नये नाहीतर सुती कापड जळण्याची शक्यता असते आणि मूग कोरडे होवून कडक होतात.
२) जर गार्लिक पावडर नसेल तर लसूणपेस्ट १/४ टिस्पून तेलात परतून घ्यावी आणि मग वापरावी.

Labels:
Mung Patties, Moong Burger, homemade burger

No comments:

Post a Comment